बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बालविवाह होत असून काही विवाह रोखले जातात. काही विवाह लपून छपून केले जात आहेत. आज बीड जवळील पांगरबावडी परिसरात दोन बालविवाह होत असल्याची माहिती झाल्यानंतर हे दोन्ही विवाह रोखण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अनेक बालविवाह झाले आहेत. काही बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले आहे. आज बीडपासून काही अंतरावर असलेल्या पांगरबावडी या ठिकाणी दोन बालविवाह होत असल्याची माहिती प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यास झाल्यावर हे विवाह रोखण्यात आले आहे.