
भू माफियांनी कब्रिस्तानची जागा सुद्धा सोडली नाही :- सय्यद सलीम बाबू
बीड (रिपोर्टर): देवस्थान इनामी जमिनीची खुलेआम अवैध प्रकारे होत असलेली खरेदी – विक्री तात्काळ थांबवा या मागणीसाठी आज जिल्हा वक्फ मंडळ कार्यालय येथे आंबेडकरी विचार मोर्चा,आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
असे की,बीड जिल्ह्यामध्ये वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत येणार्या देवस्थान इनामी जमिनीची खुलेआम खरेदी – विक्री होत असून जिल्हा वक्फ अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून अवैध खरेदी – विक्री करणार्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज जिल्हा वक्फ मंडळ कार्यालय येथे आंबेडकरी विचार मोर्चा, आंबेडकर रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हाध्यक्ष एड.ए.एन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.बीड जिल्हामध्ये वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत येणार्या जवळपास तीस हजार एकर इनामी जमीन असून त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी काय वापर झाला ? जिल्ह्यातील भू माफियांनी कब्रिस्तानची जागा सुद्धा रिकामी सोडली नाही कब्रिस्तान जागेवर सुद्धा टोळेजंग इमारती बांधून अतिक्रमण केलेली आहे यावर वक्फ मंडळ कार्यालय काय करीत आहे ?.असेर आंदोलनात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सय्यद सलीम बापू म्हणाले.
बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत येणार्या देवस्थान इनामी जमिनीची जिल्हाभरात स्थानिक नेते व भू माफिया यांच्या संगणमताने खुलेआम मोठ्या प्रमाणात खरेदी – विक्री होत आहे व त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बोगद खालचे सुद्धा झाले असून या संदर्भात आंबेडकरी विचार मोर्चा तथा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने वेळोवेळी जिल्हा वक्फ मंडळ कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून असे एकूण बारा अर्ज जिल्हा वक्फ अधिकारी यांना देण्यात आले होते तरी वरील प्रकरणे जिल्हा व अधिकारी यांनी उदासीनता दाखवून आज पर्यंत अवैध प्रकारे होत असलेल्या खरेदी – विक्रीवर प्रकरणी कसलीही कार्यवाही केली नसल्याने हे सर्व प्रकार जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याचे दिसत आहे.जिल्हा वक्फ अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग न करता त्यांनी आपला मनमानी कारभार थांबवावा.जिल्ह्यातील वक्फ मंडन कार्यालय अंतर्गत 1960 ते 2025 पर्यंत देवस्थान इनामी जमिनीचे एकूण किती खालसे झालेले आहेत व त्याचप्रमाणे बीड जिल्हा वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत किती इनामी जमीन खिदमत माशा आहे व किती इनामी जमीन मदत माश आहे व मंडळ अंतर्गत येणार्या किती जमिनीची विरासत झालेली आहे, किती जमिनीची विरासत झालेली नाही व किती जमिनींची अजून बाकी आहे, किती जमिनी वादग्रस्त आहे व किती जमिनींचे कोर्टात स्टे ऑर्डर आहे याची सविस्तर माहिती देण्यात यावी व त्याचप्रमाणे ज्या जमिनींची विराच झाली नाही त्या जमिनी तातडीने लावणी काढण्यात यावी.
तरी जिल्हा वक्फ अधिकारी यांनी अवैध प्रकारे खरेदी – विक्री प्रकरणी तातडीने पंचनामे करून वक्फ अधिनियम 1995 कलम 52 (1) (अ) प्रमाणे अवैध प्रकारे खरेदी – विक्री करणार्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सय्यद सज्जाद पट्टेदार,शेख इलियास, काशिनाथ आरगडे,समीर सिद्दिकी,किशोर डोंगरे,इमरान शेख,सय्यद दस्तगीर सह आंबेडकरी विचार मोर्चाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








