
परळी, (रिपोर्टर)ः- परळी शहरातील विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका कार्यालयासमोर दिपक देशमुख यांनी आगळे वेगळे आंदोलन केले. न.प.समोरच स्वतःला मातीत गाडून घेवून आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील विविध कामांची चौकशी व्हावी या मागणीसाठी दिपक रंगनाथराव देशमुख याने आज न.प. कार्यालयासमोर स्वतःला मातीत गाडून घेवून आंदोलन केले आहे. दरम्यान या बाबतचे निवेदन त्यांनी न.प.चे मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेले आहे.







