
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात नेमकं चाललय काय असा प्रश्नचिन्ह पडतोय मारहाणीचे अनेक प्रकरणे व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यातच काल रात्री साडेदहाच्या सुमारास चऱ्हाटा रोडवरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आली या मारहाणीत आठ ते दहा जणांचा समावेश असल्याचं पुढे आला आहे
यामध्ये मारहाण करताना लाकडी दांडे, बेल्टने ही मारहाण करण्यात आली. रक्तबंबळ होई पर्यंत हॉटेल चालकांना मारण्यात आलं. यातील जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असले तरीही मारहाण प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही.
मात्र ही मारहाण अक्षय साखरे, गजानन दहिफळे, सनी शिंदे, सह इतर आरोपींचा समावेश असल्याची माहिती मारहाण झालेल्या व्यक्तीने सांगितले आहे. आता पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतोय मात्र रात्री घडलेली घटना अद्यापही गुन्हा का दाखल नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.









