वीज कर्मचारी उघापासून कुटूबांसह उपोषणास बसणार
बीड (रिपोर्टर)ः- वीज वितरण कंपनीने वाघमारे नामक तत्रज्ञ यास निलंबीत केले असून सदरील हे निलंबन बेकायदेशीर असल्याचे वाघमारे यांनी म्हटले असून ते उद्या विज वितरण कंपनीसमोर कुटूबांसमवेत आमरण उपोषणाला बसणार आहे.
लहू योगीराज वाघमारे हे पेंडगांव कार्यालय अतर्गत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर विज वितरण कंपनीने निलंबनाची कारवाई केली. सदरील हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. आपण या संदर्भात न्याय मागण्यासाठी दि. 06-06-2025 रोजी विज वितरण कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. निलंबन रद्द करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.