
15 लाख हेक्टरमध्ये आतापर्यंत झाल्या पेरण्या
जिल्ह्यात 1 लाख 91 हजार हेक्टरमध्ये लागवड
बीड, (रिपोर्टर)ः- राज्यामध्ये यावर्षी अवकाळी आणि मान्सूनपुर्व पाऊस धो धो बरसला. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरण्या केल्या. मराठवाड्यात आतापर्यंत 30 टक्के पेरण्यात झाल्या. 15 लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यात चिंता व्यक्त केली जावू लागली. चांगला पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील पेरण्या रखडल्या आहेत.
26 मे रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. मान्सून आणि अवकाळी पाऊस धो धो बरसल्याने सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण होते. चांगला पावसामुळे पडल्यामुळे काही ठिकाणी शेतकर्यांनी लागवडीला सुरूवात केली. राज्यात जवळपास 25 ते 30 टक्के खरीपाचा पेरा झाला. मात्र गेल्या सात ते आठ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने शेतकर्यात चिंता व्यक्त केली जावू लागली. जो पेरा झाला ते उगवल्याने त्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 15 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली. त्यात 4 लाख 82 हजार हेक्टरमध्ये कापसाची तर 7 लाख 38 हजार हेक्टरमध्ये गळीत धान्यांची लागवड झाली असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 2 लाख 34 हजार 503 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. जालना जिल्ह्यात 1 लाख 97 हजार 664, बीड जिल्ह्यात 1 लाख 91 हजार 908, हिंगोली 46 हजार 505, लातुर 1 लाख 73 हजार 991, धाराशिव 2 लाख 58 हजार 692, नांदेड 2 लाख 55 हजार 164 तर परभणी जिल्ह्यात 1 लाख 51 हजार 562 हेक्टरमध्ये खरीपाचा पेरा झालेला आहे. पावसाअभावी मराठवाड्यातील पेरण्या रखडल्या आहेत.






