
एक हजार कोटींची केली तरतूर
बीड, (रिपोर्टर)ः- ग्राम रोजगार सेवकांचा नऊ महिन्यांचा पगार थकीत राहिलेला आहे. पगार द्यावा अशी मागणी सातत्याने संघटनेकडून केली जात असून पावसाळी अधिवेशनामध्ये तीन महिन्याच्या पगाराची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. एक हजार कोटी रूपये पगारासाठी टाकण्यात आले आहेत. राज्यात 27 हजार ग्राम रोजगार सेवक असून त्यांचा येत्या काही दिवसात पगार होणार असल्याचे समजते.
रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामरोजगार सेवकांची महत्वपुर्ण भुमिका असते. ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून पगार दिला जातो. गेल्या नऊ महिन्यापासून त्यांना पगार देण्यात आलेला नाही. पगाराचा मुद्दा विधानसभेत आ.धम्मारावबाबा आत्राम यांनी उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्याच्या पगारासाठी एक हजार कोटींची तरतुद करणार असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये ग्राम रोजगार सेवकांना तीन महिन्यांचा पगार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





