बीड, (रिपोर्टर)ः- लिंबागणेश परिसरात असलेल्या महाजनवाडी येथील पवनचक्कीच्या गोडाऊनमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी वॉचमनने गोळीबार केल्याने एका दरोडेखोराचा मृत्यू झाला होता. यातील दोन दरोडेखोर फरार होते. या दोघांना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल पकडण्यात आले.
गेल्या काही दिवसापुर्वी महाजनवाडी येथील पवनचक्कीच्या गोडाऊनवर चोरीचा प्रयत्न झाला होता. चोरट्याच्या दिशेने राम रूपसिंग टाक यांनी गोळीबार केला होता. यात एक दरोडेखोर ठार झाला होता तर दोघेजण पळून गेले होते. या दोघांचा पोलीस शोध घेत होते. हे दोघे काल केज तालुक्यातील साळेगाव चौक येथे असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी आबुशा भिमराव काळे (रा.कळंब), हरि उर्फ सुभाष भास्कर काळे (रा.कन्हेरवाडी कळंब) या दोघांना ताब्यात घेतले ही कारवाई पीएसआय महेश विघने, महेश जोगदंड, घोडके बप्पासाहेब, दिपक खांडेकर, राजु पठाण चालक गणेश यांनी केली.








