अजितदादा म्हणाले, हिंसा आणि असभ्य वर्तनाला माझा ठाम विरोध
कृषीमंत्र्यांचं वागणं चुकीचं, सुरज चव्हाण यांना समज दिली -तटकरे
सुरज चव्हाणकांकडून माफी, लातुरात गुन्हा दाखल
धाराशीव/मुंबई (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना निवेदन देणार्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घाडगे यांना पत्ते फेकल्याच्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण सह कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याचे तीव्र पडसाद पक्षीय पातळीवर उमटल्याचे दिसून येत असून सुनील तटकरे यांनी याबाबत सदरचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, घटना निषेधार्ह आहे, असे सांगत कालच चव्हाण यांना समज दिली. तर आज अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना बोलावल्याचे सांगितले. दुसरीकडे अजित पवार यांनी याबाबत निवेदन सादर केले असून मारहाणीची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगत कोणत्याही हिंसेला आणि असभ्य वर्तनाला माझा ठाम विरोध आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी सामाजिक जिवनात लोकशाही मूल्य जपावे, असे अजित पवार यांनी म्हटले तर दुसरीकडे सुरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर लातूरमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे घाडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पत्ते भिरकावत कृषीमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्यात यावे, तुमचे कृषीमंत्री सभागृहात पत्ते खेळतात, त्यांना घरी पाठवून हे पत्ते त्यांना खेळायला द्या, असे म्हटले. त्यानंतर युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घाडगेसह छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. याची पक्षीय पातळीवर गंभीरतेने दखल घेतली गेली आहे. आज धाराशीव दौर्यावर असलेले सुनील तटकरे यांनी सदरची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत सुरज चव्हाण यांना कालच समज दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं सभागृहातलं वागणं चुकीचं असल्याचे सांगत कृषीमंत्री यांनी याआधीही चुकीचे वक्तव्ये केले होते, त्यांना त्याबाबत समज देण्यात आली होती. तर दुसरीकडे सुरज चव्हाण यांना अजित पवारांनी बोलावून घेतल्याचे तटकरे यांनी म्हटले. याच दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक निवेदन सादर केले. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाणीची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे म्हणत अजित पवार यांनी कोणतीही हिंसा अथवा असभ्य वर्तनाला माझा ठाम विरोध आहे. कार्यकर्त्यांनी सामाजिक जिवनात लोकशाही मूल्ये जपावेत, अशी प्रतिक्रिया दिली. तिकडे सुरज चव्हाण यांनीही माफी मागितली. मात्र लातुरात सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आले आहते.








