कर्मचारी थांबत नसल्याने रुग्णांचे हाल
बीड (रिपोर्टर): वांगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी थांबत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सदरील हे रुग्णालय बांधले कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत असून कर्मचार्यांनी रुग्णालयात थांबावे, अशा सक्तीच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
वांगी आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचार्यांची नियुक्ती आहे, मात्र हे कर्मचारी रुग्णालयात रात्रीच्या दरम्यान थांबत नाहीत. रात्री एखादा रुग्ण आला तर त्यास थेट बीड येथे यावे लागते. शासनाने रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य केंद्र बांधले, मग कर्मचारी थांबत नसतील तर हे रुग्णालय काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित करत रुग्णालयात कर्मचार्यांनी थांबावे, तसे सक्तीचे निर्देश वरिष्ठांनी द्यावे, अशी मागणी हरिभाऊ शेळके यांनी केली आहे.







