
विद्यार्थ्यांना देण्यात आलेले कपडे पंधराच दिवसात फाटले, अनेकांच्या चीन तुटल्या
————————
गेवराई (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या 325 शाळेत शिकत असलेल्या 20 हजार विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप गणवेश वाटप झालेला नाही. काही विद्यार्थ्यी अजूनही वंचित आहेत. गट शिक्षण विभागाच्या खात्यात पैसे येऊन ही, स्वार्थी धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून, टक्केवारीच्या जाचक अटीत गोरगरीब विद्यार्थ्यांचा गणवेश अडकला आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेला आहे. तो गणवेश पंधराच दिवसात उसावला, काही पॅन्टच्या चैन तुटल्या आहेत. निकृष्ट दर्जा असलेल्या डी स्टॉकचा कपडा आणून विद्यार्थ्यांच्या हाती बोगस गणवेश दिल्याने, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
गेवराई तालुक्यातील 235 जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थ्यांचा गणवेश घोटाळा उघडकीस आला आहे. साठ लाख रूपयांचा निधी उपलब्ध असताना ही, विद्यार्थ्यांच्या हाती निकृष्ट दर्जाचा गणवेश का दिला ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदरील गणवेश गट विकास अधिकारी शिंदे यांच्या संमतीने, शिक्षण विभाग सांभाळणार्या शेळके व पौळ यांनी स्वतःच्याच मर्जीतल्या एजन्सीकडून गणेश खरेदी केला. मुख्याध्यापकांना निरंक प्रस्ताव सादर करण्याचे फर्मान सोडून, त्यावर ठरलेल्या एजन्सीचे नाव टाकून; गणवेश वाटप झालेले आहे. यामध्ये, गट शिक्षण अधिकार्यांने स्वतःच कंत्राटदारी केलेली आहे. गेवराई तालुक्यातील तलवडा, पाचेगाव, जातेगाव आणि रामपुरी केन्द्रातील शाळांना गणवेश वाटप झालेला नाही. त्यांचे प्रस्ताव आलेत. पण, शिक्षण विभाग पैसे देत नाही. हेतू साध्य होत नसल्याने,चालढकल करीत आहे. काही मुख्याध्यापकांनी दर्जेदार गणवेश घेऊन, ठरवून दिलेला निधी मिळावा म्हणून, गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे विनंती केली. मात्र, निधी देतो. तेवढे दहा टक्के रक्कम जमा करा,असा तोंडी आदेश शिंदे यांनी, हस्तकाच्या मार्फत देण्यात आला आहे. आम्ही चांगला गणवेश दिला आहे. मग, दहा टक्के रक्कम कशाची ? असा सवाल केला आहे. त्यामुळे, गणवेश वाटप करून ही, संबंधित शाळेला निधी वर्ग करण्यात आलेला नाही. हे वास्तव, अनेक मुख्याध्यापकांनी मान्य केले आहे.
गट शिक्षण विभागाच्या चांडाळ चौकडीने ज्या शाळेंना गणवेश वाटप केला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेला गणवेश पंधराच दिवसात उसावला असून, पॅन्टच्या चैन तुटल्या आहेत. गणवेशाचा कपडा डि माल आहे. चार-पाच वर्ष सडत पडलेला गणवेश वाटप करून, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या टाळुवरचे लोणी खाणार्या गिधाड वृत्ती विषयी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कपडा निकृष्ट आहे. त्याला दर्जाच नाही. गेल्या वर्षी दिलेल्या गणवेशाचा सहा महिन्यात पोचारा झाला होता. सदरील प्रकार, वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत गेला होता. मात्र, अधिकार्यांपुढे कागदी घोडे नाचवून, चांडाळ चौकडीने वेळ मारून नेली होती. दरम्यान, गेवराई चे गटशिक्षण अधिकारी कार्यालय भ्रष्ट कारभाराचा अड्डाच झाला आहे. ज्यांची पात्रता नाही, अशा काही शिक्षकांना थेट विस्तार अधिकार्याचा पदभार आहे. गांधी बाबाच्या नावाने, धुंदीत कारभार सुरू आहे. शासन योजना फक्त कागदावरच आहेत. पुस्तक वाटपात ही, मुख्याध्यापकांना गेवराई शहरातून पुस्तक घेऊन जाण्याचे आदेश दिले जातात. वास्तविक, शाळेत पुस्तक पोहच करण्यासाठी, शासन स्तरावरून वाहतुक खर्च देण्यात येतो. असे असून देखील, गट शिक्षण अधिकार्यांकडून पुस्तक घेऊन जायचे तर जा, नाहीतर पडू दे, अशी बेधुंद उणाडकी केली जाते. वाहतुक खर्चाचे रक्कम परस्पर काढून घेऊन, स्वतःची तुंबडी भरली जाते. या सर्व, कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.









