आंदोलनात शेतकर्यांनी सहभागी व्हावे-भाई थावरे
बीड, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारने शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी उद्या राज्यात ठिक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येणार असून या संघटनेच्या आंदोलनाला आपला पाठींबा असून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केले आहे.
राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्य सरकारने कर्ज मुक्तीची घोषणा करून शेतकर्यांना कर्जातून मुक्त करावे अशीमागणी सातत्याने भाई आ.बच्चू कडू यांनी केली आहे. प्रहार संघटनेच्या वतीने उद्या राज्यातल्या विविध भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. माजलगाव शहरातील परभणी चौकात आंदोलन होत असून या आंदोलनात शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाई गंगाभिषण थावरे यांनी केले आहे.








