सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला,
माजलगाव धरणात फक्त 10 टक्के पाण्याचा साठा
बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाळा सुरू होवून 51 दिवस उलटले. या दिवसापैकी 36 दिवस कोरडे गेले आहेत. कमी पावसामुळे मराठवाड्यातील धरणात पाणी साठण्याचे प्रमाण ही कमी आहे. मराठवाड्यातील मोठ्या 11 धरणात 59 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील धरणात फक्त 10 टक्के पाणी साठा जमा झालेला आहे.
मे महिन्यामध्ये राज्यात अवकाळी पाऊस पडला होत. या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जमा झालेला होता. जुन आणि जुलै महिन्यामध्ये मात्र मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाळा सुरू होवून 51 दिवस झाले. या पैकी 36 दिवस हे कोरडे गेले. जुन महिन्यात मराठवाड्यात 160 मि.मि. पाऊस पडला तर जुलै महिन्यात 126 मि.मि. पाऊस पडल. कमी पावसामुळे मराठवाड्यातील 11 धरणात 59 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे.
जायकवाडी धरणात 77 टक्के, येलदरी 86, विष्णूपुरी 68 टक्के, दुधना 43, सिध्देश्वर 27 आणि माजलगाव धरणात 10 टक्के, केज मधील मांजरा 24 व सिना कोळेगाव धरणात 51 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. इतर छोट्या धरणात तर कमी प्रमाणात पाण्याचा साठा जमा झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस पडला तरच धरणामध्ये पाणी जमा होवू शकते. दोन महिन्यात 36 दिवस कोरडे गेल्याने ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.








