
जिल्ह्यातले शिवालय भक्तांनी फुलले
प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंची गर्दी

बीड/परळी (रिपोर्टर): श्रावणी सोमवारनिमित्त बीड जिल्ह्यातले ठिकठिकाणचे देवालय भक्तांच्या मांदियाळीने गजबजल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी परळीत गर्दी केल्याचे दिसून येते. कंकालेश्वर, कपीलधार, सौताडा, गोरक्षनाथ टेकडी यासह अन्य गडांवर आणि शिवालयांमध्ये हर हर महादेवचा गजर ऐकावयास मिळत आहे.

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने शिवशंभेचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातल्या शिवालयांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक परळीत डेरेदाखल झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत 50 हजारापेक्षा जास्त भाविकांनी प्रभू वैदद्यनाथाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. त्यासह बीड जिल्ह्यातील कपीलधार, सौताडा, कंकालेश्वर, गोरक्षनाथ टेकडी, सोमेश्वर यासह जिल्ह्यातील शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी आणि शिवशंभोच्या जयजयकाराने अस्मांत दुमदुमून गेल्याचे पहावयास मिळाले.








