
कर्मचारी कार्यालयाबाहेर
बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज असल्याने कोणत्याच अधिकारी, कर्मचार्यावर वचक राहिलेला नाही. त्यात मुख्य कार्यकारी अधिकार, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी आणि विभागप्रमुक रजेवर असला की, इतर दुय्यम अधिकारी आणि कर्मचारी सह्या करून थेट घर वा इतर ठिकाण गाठतात आणि सर्वसामान्यांचे कामे तसेच खोळंबून राहतात.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे हे दोन प्रमुख अधिकारी रजेवर असल्याने इतर खातेप्रमुख आणि कक्षाधिकारी, सहाययक प्रशासन अधिकारी उपस्थितीच्या सह्या करून थेट चहाची टपरी, घर, शेत गाठतात. आपल्या इतर कामांना चकाट्या पिटत प्राधान्य देतात. यामुळे जिल्हाभरातून दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सामान्य माणसं आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेमध्ये आले की, त्यांच्या कामांचा खोळंबा होतो. या बाबीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान यांनी गांभीर्याने घेऊन अशा कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारावा.








