
बीड (रिपोर्टर): स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक विभाग कामाला लागला. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रारुप गट-गण जाहीर झाल्यानंतर आता नगरपालिका आणि नगरपंचायतींचे प्रारूप प्रभाग 18 ऑगस्टला जाहीर होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट-गण प्रारुप आराखडे जाहीर झाले. त्यानंतर आता नगरपालिका व नगरपंचायतींचे प्रभाग प्रारुप जाहीर होणार आहेत. 18 ऑगस्टला ते जाहीर होत असून याकडे स्थानीक राजकीय पुढार्यांचे लक्ष लागून आहे. प्रारूप प्रभागांमध्ये किती प्रमाणात बदल होतो, कोणते विभाग कुठल्या वार्डात जातात याकडे स्थानीक इच्छूकांचे लक्ष लागलेले आहे. 18 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत.








