
अजित पवारांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड मोहिम
जवळपास 15 ते 20 लाख झाडांची लागवड करून जोपासण्यात येणार
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असून या वृक्ष लागवडीचा शुभारंभ येत्या 4 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात होणार असून या वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच खाते प्रमुख अधिकार्यांची बैठक होत असून या बैठकीमध्ये या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. जवळपास अंदाजे 15 ते 20 लाख वृक्ष लागवड या मोहिमेत करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, हरित आवरण वाढविणे आणि सामाजिक वनीकरण चळवळीला गती देण्यासाठी राज्यात सर्वत्र महावृक्ष लागवड मोहिमेची सुरूवात करण्यात येत असून बीड जिल्ह्यातही येत्या 4 ऑगस्ट रोजी या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. या वृक्ष लागवडीचा शुभारंभ खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील क्रिडा विभागाच्या मेैदानात करण्यात येणार आहे. ही वृक्ष लागवड मोहिम शासकीय गायरान जमिन, शासकीय कार्यालय परिसरातील शिल्लक असलेली जागा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांना या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करणे आणि नियोजन करणे यासाठी याचे नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले असून नियोजनात कोठेही कसून राहु नये यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे. या वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक शासकीय विभागातील एका अधिकार्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी धार्मिक, अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकार्यांसह जवळपास सर्वच खाते प्रमुखांची बैठक होत आहे.








