
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड (रिपोर्टर): ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या नियमित पगार होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. राज्य सरकारने त्यांचा पगार नियमित करावा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये ग्रा.पं.अंतर्गत काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांच्या पगारा राज्य सरकार वेळेवर करत नाही. पगारासाठी व इतर मागण्यांसाठी आज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक कर्मचार्यांचा सहभाग होता. हे आंदोलन कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.








