
भाविक भक्तांनी उपस्थित रहावे:- शांतीब्रह नवनाथ बाबा
बीड (रिपोर्टर): विसाव्या शतकातील महान सद्गुरू संत किसन बाबा महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मरणार्थी गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या शनिवार दि 9 ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने सांगता होणार आहे.

उद्या सकाळी 4 वाजता किसन बाबा महाराज यांच्या समाधीची पूजन गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते विधिवत करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 01 वेळेत विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर बुलढाणा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यांना कीर्तन साथ नानाभाऊ म .लांडे, लक्ष्मीकांत म .कदम यांची व मृदुंगसाथ धनंजय म.बोंगणे , अनिकेत म .लांडे यांची राहील.काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाच्या महापगती बसवण्या येतील महाप्रसादाच्या महापांगतीने सात दिवस सुरू असणार्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे गुरुवर्य किसानबाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन कीर्तन, अभंगवाणी, भारुड, हरी जागर यांनी भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांनी भक्तीचा आनंद घेतला. जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांनी केले. चौकट: – पार्किंग व्यवस्था पिंपळनेर पोलीस ठाणे पी आय घुगे साहेब यांच्या चोख नियोजनात देवस्थान परिसरात सुमारे 8 ते 10 एकर मध्ये करण्यात आली आहे.








