अध्यक्षपदासाठी पिसोरे, देशपांडे, करांडे यांच्यात लढत
मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर होणार
बीड(रिपोर्टर): बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत अनेक वकीलांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. सुभाष पिसोरे, अॅड. प्रशांत देशपांडे आणि अॅड. गणेश करांडे या तीन उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
बीड जिल्हा वकील संघासाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी सुभाष गुरुलिंग पिसोरे, अॅड. गणेश नवनाथराव करांडे, अॅड. प्रशांत पंडितराव देशपांडे हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. रघुराज देशमुख, अॅड. शहादेव भंडारे, अॅड. संग्राम तुपे, सचीव पदासाठी अॅड. सुभाष काळे, अॅड. किशोर खेडकर, सहसचीव पदासाठी अॅड. धीरतजकुमार कांबळे, अॅड. शेख फेरोजमिया खालेद, कोषाध्यक्षपदासाठी अॅड. योगेश टेकाळे, अॅड. दिनेश नाटकर, ग्रंथपाल सचीवपदासाठी अॅड. सय्यद अजीम सय्यद खाजापाशा, अॅड. मच्छिंद्र कोंडीराम ससाने, अॅड. राहुल सुर्यवंशी, महिला प्रतिनिधी पदासाठी अॅड. मनिषा गडकर, अॅड. बबिबता पळशेकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी होणार.








