
आज मतमोजणी सुरू
सायंकाळपर्यंत निकाल लागणार
बीड (रिपोर्टर): परळी येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या 17 जागांपैकी 13 जागांसाठी परवा झालेल्या मतदानाची मतमोजणीला आज बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवात झाली असून दुपारी एकच्या सुमारास सर्व पतपत्रिका एकत्रीत करण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षीत असून मुंडे भाऊ-बहिणींच्या पॅनल विरोधात राजाभाऊ फड यांनी तीन उमेदवार रिंगणा उतरवले आहे. सदरची निवडणूक होत आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेले वैद्यनाथ अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या बँकेसाठी एकूण 17 सदस्य असून तब्बल 42 हजार 963 मतदार आहेत. 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी 17 पैकी 4 जागा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. 13 जागांसाठी मतदान झालेले असून प्रतिस्पर्धी राजाभाऊ फड हे केवळ 3 जागा लढवत आहेत. मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून सर्वप्रथम सर्व मतपत्रिका एकत्रित केल्या जात आहेत. या बँकेचा अंतिम निकाल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येणे अपेक्षीत आहे.






