
गेवराई तालुक्यातील घटना.
बीड रिपोर्टर
गेवराई तालुक्यात आज दुपारी खळबळजनक घटना घडली २ वर्षाच्या मुलीला फाशी देऊन, नंतर आईनेही गळफास घेतला. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे घडली. असून घटनेचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.
अंकिता बळीराम घवाडे वय २५ वर्ष. या महिलेने आपली २ वर्षाची मुलगी शिवप्रीती घवाडे हिला आपल्या घरातील माळवदाच्या हलकडी ला फाशी देऊन स्वतःही गळफास घेतला. ही घटना आज दुपारी घडली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड शहरातील सरकारी दवाखान्यात आणले आहेत. सदरील प्रकरण कुठल्या कारणाने घडले हे अद्याप समजू शकले नाही.पुढील तपास पोलिस करत आहेत.








