
संभाजी ब्रिगेडचे लक्षवेधी आंदोलन
बीड (रिपोर्टर): शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला असून राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले तर अखिल भारतीय बहुजन शेतकरी गायरान धारक न्याय हक्क मोर्चाच्या वतीनेही शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दूधभेसळ रोखून दुधाला प्रतिलिटर 70 रुपये भाव देण्यात यावा, उसाला एफआरपीनुसार भाव द्यावा, शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. तर अखिल भारतीय बहुजन शेतकरी गायरान धारक न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीनेही शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मौजे करचुंडी येथील गट नं. 49 व 66 मधील गायरान जमीनी 1965 ते 1990 मधील गायरान जमीनीचा सातबारा देण्यात यावा, सातबारामध्ये शेतकर्यांचे नाव नोंद करण्यात यावे, पीक पंचनामे करून शेतकर्यांना पेन्शन देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जयसिंग वीर सह आदींचे धरणे आंदोलन सुरू आहे.








