
तालुक्यातील आरोग्य सेवा विस्कळित
परळी वैजनाथ (रिपोर्टर): दहा वर्षे सेवा पुर्ण झालेल्या आरोग्य कर्मचार्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करावे, बदली धोरण, वेतनवाढ,आरोग्य व अपघात विमा आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी,कर्मचारी एकत्रिकरण समितीच्या वतीने दि.19 ऑगस्ट पासुन सुरु असलेले कामबंद व परळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन दि.21 ऑगस्ट रोजी तिसर्या दिवशीही सुरुच आहे.या आंदोलनात परळी तालुक्यातील 86 कर्मचारी सहभागी झाले आहेत.यामुळे परळी
दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्यांचे 100 टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी 30 टक्के याप्रमाणे सा.आरोग्य विभाग, ग्राम विकास,नगर विकास,वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात समावेश करावा आदी मागण्यांसाठी परळी तालुक्यातील 86 आरोग्य कर्मचार्यांनी मंगळवार दि. 19 ऑगस्ट पासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनामुळे परळी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नियमित लसीकरण,तपासणी,औषधोपचार आदी आरोग्य सेवा विस्कळित झाल्या आहेत.या कामबंद आंदोलनात विष्णू मुंडे,सुप्रिया घुंडरे,अंजली वाळले,सुप्रिया तिडके, विजयमाला टाक,अर्चना घुंडरे, जे.पी.घाडगे, ए.डी.चित्तापुरे, अश्विनी मुंडे, समिती लटपटे, सिमीती जाधव, एस.व्ही.बोरवड, एम.एच.नेमाडे, गोविंद लोखंडे, उमेश शिरोळे, शुभम पोतदार, मगन वसावे, गोविंद पौळ, मिलिंद सोनकांबळे, आनंद टेकाळे, सुमंत पवार, आशिष वाघमारे, सागर जाधव, शिवाजी वैद्य, संतोष गायकवाड आदी 86 आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.









