
पाच जनावरे, दोन चारचाकी वाहने जप्त
आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस
बीड (रिपोर्टर): बीड शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून जनावरे चोरणार्या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन आरोपी फरार आहेत. पकडलेले आरोपी गांधीनगर येथील असून या आरोपींकडून पाच जनावरे, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
नितीन संजय जाधव (रा. गांधीनगर) व दीपक चंदू गुंजाळ (रा. गांधीनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून जनावरे हस्तगत करण्यात आले.त याचबरोबर दोन चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आले. अन्य दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींनी जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून जनावरे चोरले असल्याचे उघडकीस आले आहे. फरार असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, अशफाक सय्यद, मनोज परजने, विक्की सुरवसे, स्वाती मुंडे, चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.







