बीडचे तत्कालीन डीएचओ अमोल गितेला धो धो धुतले
बीड (रिपोर्टर): बीडचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना एका फ्लॅटमध्ये तरुणीसोबत पकडल्याने दोन युवक आणि युवतीने धो धो धुवत पोलिसांच्या हवाली केले. गिते सध्या बुलढाणा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मूळचे बीड येथील रहिवासी असलेले आणि बीड येथे तब्बल वर्षभरापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून अमोल गिते हे कार्यरत होते. काल बुलढाणा येथे हिराळे गॅस एजन्सी परिसरात एका फ्लॅटमध्ये अमोल गिते हे रंगेल चाळे करत होते. परिसरात ही माहिती कळताच दोन युवक आणि एका तरुणीने फ्लॅटचा दरवाजा तोडून अमोल गिते यांना धो धो धुतले. गिते हे विवाहित आहेत तरीही रंगेल चाळे करत असल्यामुळे रहिवाश्यांनी 112 क्रमांकावर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गिते आणि संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आहे. गिते यांच्या या रंगेल चाळ्यांबद्दल आरोग्य विभागात चर्चा होत आहे.







