
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गटसचिवांचे आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- गटसचिवांच्या पगाराची रक्कम थकीत असून या रक्कमेसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याची दखल प्रशासन घेत नसल्याने गटसचिवांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सदरील गटसचिवांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आहे.
सेवा सहकारी सोसायटीच्या अंतर्गत 86 कर्मचारी कार्यरत आहेत. मागील चार ते पाच वर्षापासून या गटसचिवांचे पैसे थकलेले आहेत. या पैशासाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरवा केलेला आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने गटसचिवांनी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. यावेळी उनवणे, स्वाती वाघमारे, बहिर, अशोक मस्के, राजेंद्र शिंदे, संजय काळे, अनमुलवाड, जोशी, शेळके, डी.एस. वाघमारे, चव्हाण, कादरी, साळी, काळे, भोसले, कोळे, सुरवसे, डोईफोडे सह आदींची उपस्थिती होती.








