
मुंबई, (रिपोर्टर)ः- परिवहन विभागाकडून (आरटीओ) अर्जदारांना वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणार्या ‘लर्निंग लायसन्स’च्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक असून, केवळ कागदपत्रे आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नसल्याचे राज्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबई सेंट्रल आरटीओच्या भेटीदरम्यान या प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबीही त्यांनी दिली.








