
पहिल्यांदाच नाथ सागराचे सर्वच 28 दरवाजे उघडले
सव्वा लाख क्युसेसने पाणी गोदावरीच्या पात्रात

गेवराई तालुक्यातील 35 गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यातही तुफान पाऊस, 18 मंडळात अतिवृष्टी
खरीपाची पिके उध्दवस्त, सर्वच तालुक्यातील शेती पिकांना पावसाचा फटका

गेवराई( रिपोर्टर):- गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस चालू असून या पावसाने नाथ सागर 98 टक्के पेक्षा जास्त भरले असून या धरणाचे सर्व 27 दरवाजे खुले केले असून यातून 1 लाख 13 हजार क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग गोदावरी पत्रात सुरू असून यामुळे गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील दत्त भोजन स्थान मंदिर, राक्षसभुवन येथील शनी मंदिर, राजापूर येथील महादेव मंदिर हे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून गावाला पाण्याचा वेडा पडला आहे. यासह गोदाकाठच्या अनेक गावांत पाणी घुसलल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान गेवराई तालुक्यातही काल दुपारपासून व रात्रभर पासून मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाने छोटया मोठ्या नदी – नाल्यांना पूर आला आहे. रात्रभर पाऊस सुरू राहील्याने गेवराई तालुक्यातील गेवराई-उमापूर राज्य मार्ग आणि गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरच्या गंगावाडी येथील पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने जवळपास 10 ते 12 गावचा संपर्क तुटला आहे. तर नागझरी गावाला गोदावरी नदीवरून जोडणारा एकमेव कोल्हापूरी बंधारा पाण्याखाली गेला असून हे या गावचा पूर्ण संपर्क तुटला आहे. राजापूर गावाला जोडणार्या कापशी नदीला पूर आल्याने राजापूरचा संपर्क तुटला आहे तर तिकडे गोदावरीच्या पाण्याने गावाला वेडा टाकला आहे. याबाबत प्रशासन सतर्क असून गावच्या संपर्कात असून काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे.

गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे – तहसिलदार संदिप खोमणे
तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच परिसरात विनाकारण फिरू नये प्रशासनास योग्य ती मदत करण्यासंदर्भात गावातील तलाठी, मंडळ अधिकारी यांना शासन स्तरावरच्या सुचना देण्यात आल्या आहेत तसेच गोदावरी परिसरातील गावातील नागरिक यांनी गोदाकाठ परिसरात जाऊ नये असे अहवान गेवराई महसुल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसा पासुन परतीच्या पाऊसांची सुरूवात झाली आहे गेवराई तालुक्यातील दहाही महसुली मंडळात जोरदार पाऊस पडला असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे तसेच अनेक शेतजमिन व गोदाकाठ तसेच गोदावरी पात्र दूथडी पाण्याने वाहू लागली आहे यामध्ये काही गावांचा संपर्क तूटला आहे प्रशासन यासाठी सतर्क असून गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदापात्र परिसरात जाऊ नये यामध्ये जिवित हानी होऊ शकते अधिक माहिती साठी नागरिकांनी नायब तहसिलदार 7841009999 /9420031414 या क्रंमावर संपर्क करावा असे अवाहान गेवराईचे महसुल प्रमूख तहसिलदार संदिप खोमणे यांनी केले आहे.
बंधार्याचे दरवाजे उघडेणात, पुराचा धोका वाढला
जायकवाडी येथून गोदावरी नदीच्या पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र मंगळूर येथील बंधार्याचे काही दरवाजे वर उचलत नसल्याने पाणी गोदावरीचे पात्र सोडून शेतातून वाहू लागले आहे. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. तर गावात पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
गोदाकाठच्या या बत्तीस गावांना बसणार पुराचा फटका
अगारनांदुर, कटचिंचोली, हिंगणगाव, पांगुळगाव सुरळेगाव, संगमजळगाव, पंचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापूर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगाव, तपेनिमगाव, ढालेगाव, श्रीपतअंतरवाला, गोपतपिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज, पाथरवाला बुद्रुक, गुंतेगाव, पाथरवाला खुर्द, बोरगाव बुद्रुक यासह आदी गावांना पुराचा धोका असून मोठा फटका बसणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने या पावसात 18 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील राजुरी, नाळवंडी, चर्हाटा, शिरस पारगाव तर पाटोदा तालुक्यातील पाटोदा, थेरला तर गेवराई तालुक्यातील धोंडराई, उमापुर, रेवकी, तलवाडा, गेवराई, चकलांबा तर परळी तालुक्यातील पिंपळगाव तर शिरूर तालुक्यातील शिरूर, रायमोह, ब्रम्हनाथ येळंब, तिंतरवणी, खालापुरी या 18 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.








