
13 शेतकर्यांसह मुलांना एनडीआरएफने वाचविले
आ. धसांची सतर्कता कामी आली
आष्टी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. गेल्या दहा दिवसांपासून अवघ्या जिल्ह्याच्या शेतापोतात पाणीच पाणी पहायला मिळत आहे. आष्टीच्या सिना मेहकरी-कांबळी नदीच्या संगमावर वसलेल्या हिंगणी गावचे 13 शेतकरी व काही मुले अडकल्याची माहिती झाल्यानंतर त्यांना ड्रोनच्या माध्यमातून शोधून एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षितस्थळी हलवले. हे थरारक ऑपरेशन काल सायंकाळी करण्यात आले. आ. सुुरेश धस यांच्या सतर्कतेमुळे अडकलेल्या लोकांचे जीव वाचले.
सीना मेहकरी-कांबळी नदीच्या संगमावर वसलेल्या हिंगणी येथील गावातले 13 शेतकर्यांसह काही मुले अद्यापही पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आ. सुरेश धस यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ एनडीआरएफ पथकाला संबंधित शेतकर्यांना शोधण्याबाबत सांगितले. शेतकर्यांना शोधण्यासाठी पाण्याची मोठी अडचण आडवी येत असल्याचे पाहून अखेर ड्रोनच्या सहाय्याने या शेतकर्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा शेतकरी शोधले गेले तेव्हा एनडीआरएफच्या पथकाने बोटमधून त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले.








