
केजकरांना 6 कि.मी.अंतराचे 85 रुपये मोजावे लागतात
केज (सय्यद माजेद):- मांजरसुंबा ते धायगुडापिंपळा या महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. हे काम एचपीएम कंपनीमार्फत करण्यात येत आहे. काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अर्धवट काम असतानाच कंपनीने टोल घेण्यास सुरुवात केली. केजकरांना मात्र 6 कि.मी. अंतरासाठी 85 रुपयांचा टोल द्यावा लागत आहे. दरम्यान काम पूर्ण केल्यानंतरच टोलची वसुली करावी, अशी मागणी केली जाऊ लागली, असे निर्देश संबंधित विभागाने कंपनीला द्यायला हवे.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्र. 548 डी या धायगुडा पिंपळा ते मांजरसुंबा रस्त्याचे काम नाशिकच्या एचपीएम कंपनीला देण्यात आलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी रस्त्याचे काम करत आहे. मात्र अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच कंपनीने टोल वसुली सुरु केली. काम पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुलीला सुरुवात करायला हवी, तसे निर्देश राज्य महामार्ग विभागाने कंपनीला द्यायला हवेत. दरम्यान केजकरांना 6 कि.मी. अंतरासाठी 85 रुपयांचा भुर्दंड टोलच्या माध्यमातून भरावा लागत आहे.








