
सेतू केंद्रावर महिलांची गर्दी
बीड (रिपोर्टर): गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकारने सत्तेवर आल्यापासून लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळे निकष लावले आहेत. त्यातच गेल्या एक महिन्यापूर्वी त्यांनी या सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचे दीड हजार रुपये मिळणार नाही, असा निर्णय घेतला मात्र निर्णय घेतल्यापासून या केवायसीची वेबसाईय पूर्णपरे बंद आहे. केवायसी करण्यासाठी महिला सेतू केंद्रावर जातात आणि पुन्हा रिकाम्या हाताने परततात.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाहकी बहिण योजना सुरू केली. त्यामुळेच सत्तेवर आलेल्या सरकारने लाडक्या बहीण योजनेतून महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारी कर्मचारी महिला, ज्या महिलांचे पती इन्कम टॅक्स भरतात अशा सर्व महिलांना या योजनेतून कमी केले. त्यानंतरही या योजनेसाठी मोठठ्या प्रमाणात निधी लागत असल्यामुळे या योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी करून घ्यावी, असा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेतल्यापासून आजपर्यंत केवायसीची वेबसाईट बंदच आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.








