
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
नवी दिल्ली (वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या न्यायालयात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचार्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांना न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले. या घटनेनंतर, न्यायालयीन कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते, परंतु नंतर ते सुरळीतपणे सुरू झाले. बाहेर पडताना त्या वकिलाला सनातन का अपमान नहीं सहेंगे असे ओरडताना ऐकू आल्याचे साक्षीदारांनी सांगितले. घटनेदरम्यान सरन्यायाधीश गवई पूर्णपणे शांत राहिले. त्यांनी उपस्थित वकिलांना उद्देशून म्हटले, या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.








