
टाकरवण (रिपोर्टर):-गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथे मागील आठवड्यात गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे व सोलार पूर्ण पणे पाण्यात गेले होते त्यामुळे शेतकरी भानुदास प्रभाकर वाकळे यांच्या शेतातील 7.5 कझ असलेले सोलार चे खूप मोठे नुकसान झाले आहे
त्यामुळे शेतकर्यांना सद्या शेतामध्ये उभे पिके असल्यामुळे पीक सुकून व करपू लागले आहेत त्यात सद्या लाईट चा खूप मोठा प्राब्लेम निर्माण झाला सोलरचे मोठे नुकसान झाल्यामुळे आत्ता सोलार सुरु होत नसल्यामुळे आत्ता शेतकर्यांनी करायचे काय हा शेतकर्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शक्ती कंपनीच्या संबधीत अधिकर्याने लवकरात लवकर पंचनामा करून शेतकरी भानुदास रामदास वाकळे यांना नवीन सोलार उपलब्ध करून द्यावे.









