
बीड (रिपोर्टर): जून ते सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्यातही शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. जून-ऑगस्टपर्यंत 2 कोटी 45 लाख रुपये वाटम करण्यात आले आहे.
राज्यामध्ये यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. जून ते ऑगस्ट या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. या पावेती पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी पंचनामे झाल्यानंतर त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. राज्य सरकारने जून ते ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यातील शेतकर्यांना अनुदानाचे वाटप केले. जवळपास 2 कोटी 45 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.








