
अभिनेते पंकज धीर यांचे निधन
मुंबई (रिपोर्टर): सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. 15 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती होती. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावर काही अंशी त्यांनी मात केली होती, पण आता तो आजार पुन्हा बळावला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानंन सिनेइडंस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं, परंतु त्यांनी त्यावर मात केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो पुन्हा बळावला आणि त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांनी यासाठी मोठी शस्त्रक्रिया देखील केली होती. सिंटा कडून मंगळवारी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं, ज्यात धीर यांच्या निधनाची पुष्टी करण्यात आली.








