
बीड (रिपोर्टर)ः- बीड बसस्थानकामध्ये काल पुन्हा चोरीची घटना घडली. पोलीसांच्या आर्शीवादामुळेच चोर्या होत असल्याचे दिसून येत आहे. अंबोजागाई ते संभाजीनगर बसमध्ये चढतांना प्रवाशाच्या खिशातील 60 हजार रुपये चोरट्यांने काढून घेतले आहे.
बीड बसस्थानकामध्ये दोन दिवसापूर्वी चोरीची घटना घडल्यानंतर काल पुन्हा चोरी झाली. बाळकृष्ण भाऊसाहेब सरवदे रा.गवळवाडी ता.पाटोदा हे अंबाजोगाई ते संभाजीनगर बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पॅन्टीच्या खिशातील 60 हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढून घेतले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








