
बीड ,(रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी MPDA व MCOCA कायद्या अंतर्गत बर्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या सुचनेवरुन प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांनी दि. 18.09.2025 रोजी आरोपी सय्यद अन्वर सय्यद अजगर वय 41 वर्षे रा. खतीब गल्ली, अंबाजोगाई व आरोपी चाँद इमाम गवळी तय 44 वर्षे रा. गवळीपुरा अंबाजोगाई जि. बीड यांने विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी,बीड यांना सादर केला होता.
आरोपी सय्यद अनवर सय्यद अजगर याचे विरुध्द पो.स्टे. अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई ग्रामीण येथे कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळवीणे 1 रुपयाचे 90 रुपये देण्याचे अमिष दाखवुन बेकायदेशीर रित्या मटका जुगार चालविणे व धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 06 गुन्ह्याची नोंद पोलीस अधिलेखावर आहे.या व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलग 110 सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात सुधारणा झाली नाही.

तसेच चांद इमाम गवळी याचे विरुध्द पो.स्टे. अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई ग्रामीण येथे कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळवीणे 1 रुपयाचे 90 रुपये देण्याचे अमिष दाखवुन बेकायदेशीर रित्या मटका जुगार चालविणे व धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 06 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यातील पाच गुन्हे न्याप्रविष्ट व एक गुन्हा तपासावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलम 110 सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात सुधारना झाली नाही.
या प्रकरणात विवेक जॉन्सन जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 28.10.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर दोन्ही इसनास तत्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानवध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.








