
बसस्थानकातून 60 हजार रूपये चोरणार्या चोरट्यास पकडले

बीड, (रिपोर्टर)ः- परळी, माजलगावमध्ये बाईकवर येवून धुमस्टाईलने चोर्या करणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला तर बीड बसस्थानकामध्ये 48 तासापुर्वी एका प्रवाशच्या खिशातील 60 हजार रूपये चोरणार्या चोरट्यास शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चोरीचे सोने चोरटे विकण्याच्या बेतात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून नवीन थर्मल कॉलनी भागातून गुलमरज्जाक, मजलुम सय्यद वय 26 व नासेर बेग ( वय 43 रा.लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे ह.मु. ईरानी गल्ली, परळी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या जवळ पिशवीत गुंडाळलेली माजलगाव शहर गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याची बोरमाळ (24 ग्रा. अंदाजे किं. 1 लाख 25 हजार) व परळीतून चोरीस गेलेल्या गंठनाचा तुकडा (व.4.5 ग्र अंदाजे कि.50 हजार) मोटार सायकल एम.एच.05 ए.ए. 0826 असा एकूण 2 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक सुतळे, कांबळे, केकान, सानप, भताने, आंधळे यांनी केली.
तर दुसरी कारवाई शिवाजी नगर पोलिसांनी केली. 48 तासापुर्वी बाळकृष्ण भाऊराव सरवदे (रा.गवळवाडी) हेबीड बसस्थानकातून छ.संभाजीनगरला जात असतांना त्यांच्या खिशातील 60 हजार अज्ञात चोरट्यांनी काढून घेतले. या प्रकरणाचा शिवाजी पोलिसांनी तपास केला. सिसिटिव्ही फुटेज तपासले असता चोरटा निष्पन्न झाला. त्यामध्ये आरोपी गणेश कचरू पवार (रा.बहिरवाडी) याला चर्हाटा फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 60 हजार रूपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पो.अधिक्षक काँवत, अप्पर पो.अधिक्षक पांडकर, डीवायएसपी पवार, पो.नि.किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आघाव, केंद्रे, मराडे, राडकर, रहाडे, घटमाळ, कांदे, महानौर यांनी केली.








