बीड नगरपालिकेतील विवाह नोंदणीचे सर्रवर कायम बंदच
बीड, (रिपोर्टर)ः- विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्राची विविध ठिकाणी गरज असते. त्यामुळे अनेक जण नगर पालिकेमध्ये हे प्रमाणपत्र काढण्यासाठी चकरा मारत असतात. मात्र त्यांना प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी आहे ते कर्मचारी सर्रवर चलत नसल्याचे वेळोवेळी सांगत असतात. हे सर्रवर कायमचं बंद असतं का? ज्यांनी विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना हे प्रमाणपत्र त्यांच्या मुलाच्या लग्नापर्यंत तरी मिळेल का नाही असा प्रश्न उपस्थित होवू लागला.
आधार कार्ड च्या नावात दुरूस्ती करण्यासाठी यासह इतर शासकीय कामकाजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र गरजेचे झालेले आहे. हे प्रमाणपत्र बीड नगर पालिकेतून मिळते. या प्रमाणपत्रासाठी शहरातील अनेकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाची तात्काळ दखल घेतली जात नाही. सहा-सहा महिने लोकांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. प्रमाणपत्र संदर्भात विचारणा करण्यास गेल्यानंतर शिंदे नामक कर्मचारी सर्रवर चालत नसल्याचे सांगतात. हे सर्रवर कायमचंच बंद असतं का? सर्रवर बंद असेल तर मग प्रमाणपत्र मिळणार कधी? एखाद्याला तातडीची गरज असेल मग ते प्रमाणपत्र कसे उपलब्ध करायचं? काहींनी तर सहा महिन्यापासून अर्ज दाखल केलेले आहेत तरी त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही. अर्ज दाखल करणार्या व्यक्तीच्या मुलाच्या लग्नापर्यंत तरी त्यांना प्रमाणपत्र मिळणार की नाही असा सवालही अर्ज दाखल करणारे करू लागले आहेत.





