
कट रचल्याची तक्रार; दोघांची चौकशी सुरू
गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका असल्याचे आता समोर येत असून त्यांना जिवे मारण्याचा कट रचल्याचे सांगितले जात आहे. तशा आशयाची तक्रार रात्री उशिरा जालना पोलिसांकडे देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचेही सांगितले जाते. या घटनेमुळे मराठवाड्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत अहेत. त्यांच्या जिवितास धोका असल्याची माहिती आता समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट बीडमध्ये रचला गेल्याबाबतची तक्रार जालना पोलिसांत रात्री उशिरा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दोन जणांना जालना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात





