बीड, (रिपोर्टर)ः- सिरसाळा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला केेंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण सह आदींची उपस्थिती राहणार आहे. उसाच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी योग्य भुमिका घेत 3500 रूपये भाव द्यावा या मागणीसाठी भाई थावरे यांनी मंत्र्याच्या गाड्या आडविण्याचा इशारा दिल्यानंतर आज सकाळपासूनच माजलगाव पोलिसांनी त्यांना नजर कैदेत ठेवले असून ताब्यात घेतले होते.
आज सिरसाळा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण सह राज्याचे मंत्री उपस्थित राहणार होते. केंद्राने उसाला 3500 रूपयांपेक्षा जास्त भाव द्यावा अशी मागणी भाई गंगाभिषण थावरे यांनी केली होती. या मागणी संदर्भात त्यांनी मंत्र्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी आज सकाळपासून थावरे यांना ताब्यात घेतले असून नजर कैदेत ठेवले आहे.










