बीड, (रिपोर्टर)ः- पत्नीस प्रसृतीसाठी रूग्णालयात घेवून जाता असतांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गाडीचा अपघाता होवून गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर गाडीतील महिलेची प्रसृती झाली. ही घटना सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. महिलेस व बाळास रूग्णालयात दाखल करण्यात आले.
आज सकाळी 6.30 च्या सुमारास एक दांम्पत्य रूग्णालयात चार चाकी गाडीमध्ये जात होते. सदरील गाडीचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अपघात झाला. अपघातानंतर गाडी पलटी झाली. पलटी झाल्यानंतर गाडीतच महिलेची प्रसुती झाली अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. महिलेस व बाळास उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.









