बीड (रिपोर्टर) राज्याचे बहुचर्चित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बीड जिल्हा दौर्यावर येत असून उद्या ते प्रभु वैद्यनाथांचे दर्शन घेणार आहेत. पुढे अंबाजोगाईला येत योगेश्वरी देवींच्या चरणाशी नतमस्तक होणार आहेत. परळी अंबाजोगाई येथील नागरिकांशी संवाद साधण्याहेतू कोश्यारी यांनी शासकीय विश्रामगृहावर आरक्षीत वेळ ठेवला असल्याचे सांगण्यात येते.
उद्या सकाळी 9.55 पासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दोर्याला सुरूवात होणार आहे. राजभवन ते पुणे ते बायरोड प्रवास करणार असून पुणे एअरपोर्टवरून 11.15 ला ते लातूर एअरपोर्टवर येणार आहेत. दुपारी 1.30 ते 2 हा जेवणासाठी राखीव वेळ ठेवण्यात आला असून पुढे ते 2 वा. अंबाजोगाईसाठी निघणार आहेत. अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेवून ते पुढे परळीला जाणार आहेत. त्याठिकाणी ते प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत.