बीड (रिपोर्टर)ः- शाळा सुटल्यानंतर घरी परत जातांना विद्यार्थ्यांत वाद निर्माण झाल्याने एका विद्यार्थ्यांस बेदमपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ही मारहाण रायमोहा येथील मतिमंद अंध विघालय परिसरात घडली. मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मात्र पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
जालींदर विद्यालयामध्ये शिक्षण घेणार्या विघार्थ्यांमध्ये परवा वाद निर्माण झाला. यात एका विद्यार्थ्यास काही विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत थरारक होता. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांस मारहाण करण्यात आली तो विद्यार्थी शिरुर तालुक्यातील दगडवाडीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.









