आई वडीलांच्या डोळ्यासमोर पोटच्या लेकरांचा शेततलावात बुडून अंत; आष्टी हळहळली
आष्टी (रिपोर्टर):- आई वडील शेतात काम करत असताना त्यांच्या सोबत गेलेल्या सख्या भाऊ-बहिणीचा शेततलावाच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना शनिवारी रोजी दुपारी तालुक्यातील टाकळसिंग शिवारात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रावणी रोहिदास चव्हाण वय 10 वर्ष,श्रावण चव्हाण 8 वर्ष अशी मयत झालेल्या सख्या भाऊ-बहिणीची नावं आहेत. ते दोघेही कुसडगांव येथील रहिवासी होते.
आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्रावणी रोहिदास चव्हाण वय 10 वर्ष,श्रावण चव्हाण 8 वर्ष हे सख्खे भाऊ-बहीण शनिवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील टाकळसिंग शिवारात असलेल्या शेतात काम करण्यासाठी आई सोबत गेले होते. दुर्दैवाने, शेततलावाच्या पाण्यात पडले. आईने ही गोष्ट पाहताच आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि हे दोघेही भाऊ-बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते. ग्रामस्थांसह पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या भाऊ-बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा केला. रुग्णवाहिकेमधून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले सख्या भाऊ-बहिणीच्या या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.घटनास्थळी सपोनि सुर्ववंशी,सपोनि विक्रांत हिंगे,पोउपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोह घाडगे आदी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.









