बीड, (रिपोर्टर)ः-शहरातील नामांकित अशा चंपावती शिक्षण संस्थेकडून प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी शाळा चालवली जाते. नुकतेच माध्यमिक शाळेमध्ये तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी नगर पालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तरी इंग्रजी शाळेला 50 चौ.मि. बांधकाम परवानगी असतांना तब्बल 150 चौ.मि. एवढे बांधकाम केलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी शाळा या पैकी काही बांधकामांची नोंद नगर पालिकेच्या पीटीआरवर नाही. तर मागील अनेक वर्षापासून या शाळेने कोणत्याही प्रकारचा कर भरलेला नाही. त्यामुळे नगर पालिका सीओ फडसे यांनी नोटीस बजावलेली आहे.
बीड शहरात नामांकित अशी चंपावती शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू आहेत. त्या प्राथमिक शाळेची 33 वर्षापासून पीटीआरला बांधकाम नोंद नाही. या शाळेने कोणताही कर ही भरलेला नाही. सोबतच चंपावती इंग्लिश स्कुल 15 वर्षापासून कोणताही कर भरलेला नसून या शाळेला 50 चौ.मि. बांधकामाची परवनगी असतांन 150 चौ.मि. बांधकाम केलेले आहे. याही शाळेची इमारत तीन मजली आहे तर चंपावती शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळेनेही 22 वर्षापासून कोणताही कर भरलेला नाही. माध्यमिक शाळेच्या लगतच नव्याने तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून यासाठीही बांधकाम परवानगी शिक्षण संस्थेने काढलेली नाही. या बाबत नगर पालिका सीओने चंपावती शिक्षण संस्थेला कर भरणे आणि बांधकाम परवानगी बाबत नोटीस बजावलेली आहे.
सीओ फडसे दै.रिपोर्टर ला बोलतांना म्हणाले की, कर आणि इतर बांधकाम परवान्या बाबत चंपावती शिक्षण संस्थेला नोटीस बजावलेली असून त्यांचा खुलासा झाल्यानंतरच पुढील कारवाई शिक्षण संस्थेवर दस्ताएवेज तपासून कारवाई करण्यात येणार आहे. या शिक्षण संस्थेसोबतच शहरातील इतर शिक्षण संस्थेतही दस्ताऐवज तपासून कर आणि बांधकाम परवान्या बाबत तपासणी करण्यात येणार आहे. मात्र ही कारवाई नगर पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर करण्यात येईल असेही फडसे यांनी संागितले.








