बीड(रिपोर्टर): बीडच्या एसटी महामंडळातील हंगामी विभागीय वाहतूक अधिक्षक शिवाजी कराड यांच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराविरोधात आष्टी, धारूर, बीड आणि अंबाजोगाई आगारातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचार्यांनी मुंबईतील महाव्यवस्थापकांकडे तक्रार केल्यानंतर कराड यांच्या चौकशीचे आदेश बीडच्या विभागीय नियंत्रक श्रीमती दुसाने यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एका वाहतूक अधिकार्याला नेमले. जो वाहतूक अधिकारी अवघ्या दोन ते तीन महिने रिटायर्डमेंटला आलेला आहे त्यामुळे कराड यांची चौकशी कशी दाबता येईल आणि कर्मचार्यांच्या गंभीर तक्रारीकडे कसे दुर्लक्ष केले जाईल याची पुर्ण दक्षता स्थानिक वरिष्ठांकडून घेतली जात असल्याने कर्मचार्यात संताप व्यक्त केला जात आहे. कराड हे निलंबनाबाबतचे कुठलेही नियम न पाळता जो आपल्या कानाखालचा असेल, आर्थिक देवाण-घेवाण करेल तो त्याचा सखा आणि जो नियमाने चालतो परंतु कराडचे ऐकत नाही तो विरोधक समजून थेट निलंबनाची कारवाई कराड करतात म्हणून त्यांच्या हुकुमशाहीची चौकशी अत्यंत सकारात्मक आणि निष्पक्ष व्हावी, अशी मागणी होत आहे.
बीड एसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी हे कामचुकारपणाबरोबर भ्रष्टाचारातही आघाडीवर असल्याच्या अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आले आहेत. परंतु बीड येथील विभागीय वाहतूक अधिक्षक शिवराज कराड हे कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने वागणूक देत आहेत. छोट्या छोट्या कारणावून कर्मचार्यांना झापणे, त्यांची अवहेलना करणे, एकेरी भाषेत बोलणे, प्रत्युत्तर दिले तर थेट निलंबनाचे हत्यार उपसणे आणि त्याच कर्मचार्यांनी पैसे दिले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे असे धोरण आखत आहेत. त्यापुढे जात आज मी विभागीय वाहतूक अधिक्षक आहे उद्या मी विभागीय वाहतूक अधिकारी होणार आहे तेव्हा मी तुमच्याकडे पाहतो अशी धमकी कराड हे देत आले. सशेवटी कर्मचार्यांनी कराड यांची तक्रार मुंबईतील महा व्यवस्थापकांकडे केली. तेव्हा महाव्यवस्थापकांनी कराड यांच्या चौकशीचे आदेश विभागीय नियंत्रक दुसाने मॅडम यांच्याकडे दिली. मात्र दुसाने यांनी चौकशी न करता कराड यांच्या चौकशीसाठी दोन ते तीन महिने रिटायर्डमेंटवर आलेल्या एका अधिकार्याची नियुक्ती केली. आपली रिटायर्डमेंट सुखरूप जावी म्हणून तो अधिका कराड यांची चौकशी करत नाही. एकूणच विभागीय नियंत्रक दुसाने या कारड यांना पाठीशी घालत आहेत. कराड यांच्या मनमानीपणाची गंभीतेने चौकशी व्हावी, अशी मागणी, आष्टी, धारूर, बीड आणि अंबाजोगाई आगारातील कर्मचार्यांनी केली आहे.
तिडके-बनसोडेंचा एसटी महामंडळाला चुना?
बीड विभागातील वाहतूक अधिकारी असलेले तिडके हे महामंडळाला सातत्याने चुना लावत आल्याची चर्चा होत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हरीयाणाच्या एका ट्रकने बसला धडक दिली. त्यात बसचे नुकसान झाले. नुकसानीपोटी संबंधित ट्रक चालकाकडून 25 हजारापेक्षा अधिक रक्कम घेतली गेली. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळाच्या खात्यावर हजार-पाच हजा रुपयेच भरल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या साथीला स्थानिक आगारप्रमुख बनसोडे हेही असतात. हे दोघे संगनमत कररून आर्थिक घोटाळे करत असल्याचे बोलले जाते. असे अनेक छोटे-मोठे अपघात याआधी झाले आहेत. त्यात एसटीचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा मोबदला अन्य वाहन चालक-मालकांकडून घेतला जातो मात्र महामंडळात तो जमा केला जात नाही, असेही सांगण्यात येते.









