आज जिल्ह्यात प्रथमच अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम
परळी (रिपोर्टर) इन्सान पहले इन्सान होता है, किसीं भी धर्म मे बटने से पहले उसने इन्सान ये पहचान बनाकर रखनी चाहीये! या साबरी ब्रदर्सच्या प्रसिद्ध कव्वालीसह, मेरे देश की मिट्टी सोना है और मोती गंगा है, सब झंडो मे जो प्यारा है, मेरे भारत का तिरंगा है! या छोटी शबनम यांच्या कव्वालीने नाथ प्रतिष्ठान आयोजित तिसर्या दिवशीच्या कव्वाली मुकाबल्यात सामाजिक एकतेचा रंग भरला.
आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तिसर्या दिवशी प्रसिद्ध कव्वाली गायक साबरी ब्रदर्स व छोटी शबनम यांच्यात कव्वालीचा मुकाबला जबरदस्त रंगला होता. जात, धर्म, पंथ सगळे विसरून समाजात एकता नांदावी, सर्व धर्मातील लोकांनी इतर धर्मियांचा देखील मान-सन्मान राखावा या संदेशासह कव्वालीच्या सुरांनी मैफल रंगली होती. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी देखील कव्वालींच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून साबरी ब्रदर्स व छोटी शबनम यांचे परळी वासीयांच्या वतीने स्वागत केले. तत्पूर्वी सायंकाळी परळीतील ज्येष्ठ व्यापारी मंडळींच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. तसेच कव्वाली मुकबल्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन मामा कुलकर्णी, जाबेर खान पठाण, जाफर भाई, नाझेर हुसेन, अय्युब भाई पठाण, अल्ताफ पठाण, सय्यद सिराज, सिकंदर शेख, अजीज कच्छी, सय्यद फेरोज, अजमत खान, शेख राजू, तकी खान, शेख चाँद, नय्युम शेख, सय्यद अफरोज, अजीम भाई टेलर, लालाखान पठाण, दत्ताभाऊ सावंत, प्रा. विनोद जगतकर, राजेंद्र सोनी, के डी उपाडे, उस्मान खान, रवी मुळे, अनंत इंगळे, प्रणव परळीकर, शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, गोविंद कराड यांसह पदाधिकारी तसेच परळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांचा बीड जिल्ह्यात पहिला लाईव्ह कार्यक्रम दरम्यान गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सायंकाळी अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांच्या प्रसिद्ध गीतांच्या कार्यक्रमाची सुरेल मैफल परळीकरांना थेट पाहता येणार असून, बीड जिल्ह्यात अजय-अतुल यांचा हा पहिलाच लाईव्ह कार्यक्रम असणार आहे. धनंजय मुंडे हे आमचे जुने मित्र असून त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कामांबद्दल आम्हाला खास आकर्षण आहे. धनु भाऊंच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पहिल्यांदा येत असून, या कार्यक्रमासाठी आम्हीही उत्सुक असल्याचे अतुल गोगावले यांनी म्हटले आहे.