गेवराई (रिपोर्टर) गेवराई पंचायत समितीचा कारभार कशा पद्धतीने चालतो हे पाहण्यासाठी आज खुद्द सीईओ अजित पवार हे कार्यालयाला भेट देणार असून सर्व विभागांची पाहणी करून गेल्या काही दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या विभागांची किती कामे करण्यात आली या रेकॉर्डची सुद्धा ते पाहणी करणार आहेत. गेवराई पं.स. नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांवरून चर्चेत असल्यामुळे सीईओ पवार पाहणी करणार असल्याचे सांगितले.
गेवराईच्या पंचायत समितीसह तेथील कर्मचारी वेळेवर हजर राहतात का? याबाबतची पाहणी करण्यासाठी आज दुपारी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार हे दाखल होणार आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोजगार हमीसह इतर योजनांची किती कामे झाली, त्यातले खरे किती आणि खोटो किती याच्या रेकॉर्डची सुद्धा ते पाहणी करणार आहेत. गेवराई पं.स. नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांवरून चर्चेत असते. याठिकाणी विकास कामांपेक्षा राजकारण जास्त होत असल्याने सीईओ पवार सर्वच अंगाने पंचायत समितीच्या कारभाराची चौकशी करणार आहेत. सीईओ येणार आहेत म्हणून सकाळ-पासून कर्मचारी आपआपल्या टेबलवर उपस्थित असल्याचे दिसून आले. एरव्ही मात्र कर्मचारी दांड्या मारताना दिसून येत असतात.